भुसावळात प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात
भुसावळ : प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील सेवाभावी सामाजिक सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था व भुसावळ रक्तदाते ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर बुधवारी घेण्यात आले. स्थानिक नेत्रम आय हॉस्पिटलमध्ये आयोजित रक्तदान शिबिरात 12 दात्यांनी रक्तदान केले. प्रमुख अतिभि म्हणून समाजसेविका शैला सावंत व जम्मू येथे सीमेवर सेवेत असलेले सीआरपीएफमधील जवान गणेश चौधरी यांच्या पत्नी उज्वला चौधरी यांची उपस्थिती होती.
यांची शिबिराला उपस्थिती
प्रसंगी संस्थापक अध्यक्षा राजश्री नेवे, माया चौधरी, स्मिता माहूरकर, अनुराधा टाक हे उपस्थित होत्या. शिबिर यशस्वीतेकरीता निलेश फण्ड, तनिक्ष भोसले, भुसावळ ब्लड बँकेचे महादेव मुळे, रवींद्र सूर्यवंशी यांच्यासह नेत्रम आय हॉस्पिटलचे डॉ.एस.एस.मेश्राम व स्टॉफ तसेच प्रफुल्लजी लोढा यांचे सहकार्य लाभले.


