ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : किराणा दुकानासह सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन


मुंबई : वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन सहज विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. जे सुपर मार्केट 1 हजार स्वेअर फुटांच्यावर आहेत तिथं एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारने मुभा दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakare) यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली वतत्यात राज्यातील किराणा दुकानं आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारचे नवीन धोरण : नवाब मलिक
बैठक संपल्यानंतर नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात बर्‍याच वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन धोरण ठरवलं आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवागनी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

भाजपा नेत्यांना लगावला टोला
राज्याच्या वाईन धोरणावर टीका करणार्‍या भाजपाचाही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी यावेळी समाचार घेतला. गोव्यात आणि हिमाचलमध्येही भाजपाने हेच धोरण आणले आहे. त्यांची सत्ता असलेल्या अनेक राज्यात भाजपाने वाईन विक्रीचं धोरण स्वीकारलं आहे. इथे मात्र ते विरोध करत आहेत, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.

फडणवीस स्पष्टच म्हणाले : महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र होऊ देणार नाही 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !