फडणवीस स्पष्टच म्हणाले : महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र होऊ देणार नाही


मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारने वाईन विक्रीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर जोरदार विरोध केला आहे. पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त, दारुबंदी संपवून दारू विक्रीला परवानगी शिवाय महाराष्ट्रात नवीन दारू विक्री परवाने देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू. महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : किराणा दुकानासह सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन

हे सरकारे नेमके आहे तरी कुणाचे ?
शेतकरी-कष्टकरी, गरीब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारुलाच. महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? सत्तेच्या नशेत धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी, असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !