खिर्डीत ऑनलाईन ग्रामसभेला ग्रामस्थांची पाठ : सभा अखेर तहकूब


खिर्डी : तालुक्यातील खिर्डी खुर्द येथे ऑनलाईन ग्रामसभेला ग्रामस्थांनी पाठ दर्शवल्याने सभा तहकूब करण्यात आली. दरम्यान, प्रशासनाच्या आदेशान्वये प्रजासत्ताक दिनी ऑनलाईन ग्रामसभा घेण्यात येणार होती मात्र कोरमअभावी तहकूब करण्यात आली. पुढील सात दिवसानंतर तहकूब ग्रामसभा पुन्हा घेण्यात येणार आहे.

ऑनलाईन ग्रामसभा जेष्ठांसाठी डोकेदुखी
जेष्ठांना मोबाईलचा पुरेपूर ज्ञान नसताना शासनाने ऑनलाईन ग्रामसभा घेण्याचे आदेश काढले असताना खिर्डी खुर्द येथे ऑनलाईन ग्रामसभा घेण्यात आली मात्र ऑनलाईन सभेबाबत उत्सुकता दिसून न आल्याने ती तहबूक करण्यात आल्याचे ग्रामसेवक गोकुळ सोनवणे यांनी सांगितले. ऑफलाईन सभेत समोरासमोर ग्रामस्थांना आपले विषय मांडणे सोयीचे होते, असेही ते म्हणाले. पुढची ग्रामसभा ही ऑफलाईन पध्दतीने घेण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठांकडून होत असल्याचेही त्यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !