भुसावळ शहरातील 40 वर्षीय विवाहिता बेपत्ता


भुसावळ  : शहरातील 40 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. शाहीन बी.शेख इम्रान (40, भुसावळ) असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी विवाहितेचे पती शेख इम्रान शेख रहिम (बिस्ती मोहल्ला, मशीदजवळ, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात हरवल्याची तक्रार दिली आहे. 11 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता शाहीन बी.शेख इम्रान यांनी कामावर जात असल्याचे सांगून बाहेर पडल्या मात्र घरी न परतल्याने सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र त्यांचा तपास न लागल्याने बाजारपेठ पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली.

विवाहिता आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
विवाहितेची उंची 5.2 इंच, वर्ण सावळा, चेहरा गोल, नाक सरळ, डोक्यावरील केस काळे, शरीराने मजबूत, अंगात काळ्या रंगाचा बुरखा, गळ्यात काळ्या रंगाची पोत असे हरवलेल्या विवाहितेचे वर्णन आहे. सदरील विवाहिता कुणाला आढळल्यास शेख इम्रान शेख (9579702378) अथवा बाजारपेठ पेालिस ठाण्याशी (02582-222399) वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !