सोन्या-चांदीच्या भावामध्ये मोठी घसरण
मुंबई : सोन्या-चांदीच्या (Gold And Silver Price) भावामध्ये मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या भावात तब्बल ९०० रुपयांची (Gold Price Fall By 900 Rupees) घसरण होवून आता दर ४८ हजार ३०० रुपये प्रति तोळा झाला आहे तर चांदीच्या भावात २ हजार ते २२०० रुपये घसरण होवून चांदीचा भाव (Silver Price Today) ६३ हजार ६०० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाल्याने ही घसरण झाल्याचे बोलले जात आहे. १० जानेवारी रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले तसेच एक किलो चादीचे दर ६२ हजार ३० रुपये असा होता. १२ जानेवारी २०२२ रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८ हजार ५७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले तर एक किलो चांदीचे दर ६२ हजार ९० रुपये इतका नोंदविला गेला.
