भामलवाडी येथून तीन म्हशींची चोरी
खिर्डी : भामलवाडी येथील शेतकरी गुलाब मिठाराम पाटील यांच्या मालकीच्या एक लाख 30 हजार रुपये किंमतीच्या म्हशी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्या. निंभोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकर्याने खिर्डी रस्त्यावर असलेल्या गट नं 189 या शेताच्या बांधावर गोठा बांधला असून त्यात गुरे बांधण्यात आली होती. गुरुवारी रात्री गुरांना चारा-पाणी केल्यानंतर शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतकर्याची मुले म्हशीची काढण्यासाठी गोठ्यात गेले असता त्यांना तिथे बांधलेल्या म्हशी दिसूनन आल्याने व त्यांची चोरी झाल्याचे उघडकीस आले. अज्ञात चोरट्याविरुद्ध निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय राजेंद्र पाटील व त्यांचे सहकारी करीत आहे.


