महिला पोलिसांना मोठा दिलासा : आता आठ तास करावी लागणार ड्युटी

पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी काढले आदेश : राज्यात प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी


मुंबई : राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे (Maharashtra DGP Sanjay Pandey) यांनी महिला पोलिसांना आता 12 ऐवजी आठ तास ड्युटी देण्याचे आदेश काढले आहेत. (Working Hours of Women Police Personnel in Maharashtra) प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी पारीत केले आहेत. महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांच्या कामाचे तास 12 तासांवरून 8 तासांवर आणण्याचा निर्णय सप्टेंबरमध्ये घेतला. त्यानुसार काही ठिकाणी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या आदेशामुळे महिला पोलिसांमध्ये प्रचंड आनदांचे वातावरण आहे.

नागपूर पॅटर्न यशस्वी
नागपूर शहरात (nagpur city) महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्यूटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलिस महासंचालक संजय पांडे (Maharashtra DGP Sanjay Pandey) यांनी पोलिीस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनीही महिला पोलिसांसाठी आठ तासांची ड्यूटी जाहीर केली होती, त्यापाठोपाठ असा निर्णय घेऊन अमरावती (amravati) आणि नुकतीच नवी मुंबई (navi mumbai) पोलिसांनीही अंमलबजावणी केली. अखेर राज्य पातळीवर निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील महिला पोलिसांना 8 तासांची ड्यूटी करायला मिळणार आहे.

ड्युटीसोबतच कौटुंबिकही जवाबदारी
पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलांवर कामाची आणि कौटुंबिक जबाबदारी देखील असते. यामुळे त्यांची बरीच दमछाक होते. यामुळे महिला कर्मचार्‍यांमध्ये आजारी पडण्याचं अन्य व्याधींनी ग्रास्त होण्याचं प्रमाण वाढते. हे टाळण्यासाठी गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव आला होता. त्यावर पोलिस महासंचालकांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याची 8 तास ड्युटी केल्यास महिला पोलीस कर्मचारी गैरहजर राहणे, आजारी पडणे हे प्रमाण कमी होईल, अशी धारणा यामागे आहे. मात्र सण उत्सव काळात महिला कर्मचार्‍यांच्या तासाबाबत वरीष्ठांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !