अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर : यावलमध्ये ट्रॅक्टर जप्त


यावल : यावल शहरासह तालुक्यात अवैध वाळू वाहतूक पुन्हा ऐरणीवर आली आहे. महसूल प्रशासनाने बेकायदा वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केले आहे. हे ट्रॅक्टर वाहन हे यावल पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शनिवार, 29 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास यावल येथील शहरातगतच्या श्री व्यास मंदिर परीसरातील हिंदु स्मशानभुमीच्या मागील बाजुस मार्गावरून स्वराज्य कंपनीचे निळया रंगाचे व विना क्रमांकाची ट्रॉली असलेल्या ट्रॅक्टरमध्ये वाळूची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. चालक संजय भगवान भोई (बोरावल गेट जवळ, यावल) याच्याकडे वाळु वाहतुकीचा परवाना आढळून आला नाही. महसुल पथकातील फैजपूर विभागाचे मंडळ अधिकारी एम.एच.तडवी, परसाडे तलाठी समीर तडवी, यावल शहर तलाठी ईश्वर कोळी, डोंगरकठोरा तलाठी, अंजाळे येथील तलाठी शरद सुर्यवंशी व टाकरखेडा तलाठी उमेश बाभुळ्कर, डोंगरकठोरा तलाठी वसीम तडवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !