शिक्षक परीक्षा घोटाळा : कृषी विभागाच्या उपसचिवाला अटक


पुणे : कृषी विभागाचे विद्यमान उपसचिव व शिक्षण विभागाचे उपसचिव असलेल्या सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली होती. आरोपीला शिवाजी नगर न्यायालयात हजर केले असता त्यास 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, शिक्षक परीक्षा घोटाळ्यात आता राज्याच्या वरिष्ठ आयएएस अधिकार्‍याला अधिकार्‍याचा हात असल्याचे उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती.

सुपेच्या सांगण्यावरून त्या कंपनीला कंत्राट
टीईटी परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला शिक्षण परिषदेकडून 2020 मधे ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. मात्र शिक्षण परिषदेचा निलंबित अध्यक्ष तुकाराम सुपे याच्या सांगण्यावरून सुशील खोडवेकरने जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढले आणि या कंपनीला पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले. हे सगळे करण्यासाठी उपसचिव सुशील खोडवेकरला पैसै मिळाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर या प्रकरणात अटक असलेला तुकाराम सुपेचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर हा वेळोवेळी मंत्रालयात जाऊन सुशील खोडवेकरकडून टीईटी घोटाळ्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी करून घेत होता. पोलिसांच्या तपासात हे उघड झाल्यानंतर खोडवेकरला ठाण्यातील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केलीय. यामुळे या प्रकरणात पुणे सायबर पोलिसांचा तपास आता मंत्रालयापर्यंत पोहचला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !