यावल तालुका भाजपा महिला उपाध्यक्षपदी मालती पाटील


यावल : भारतीय जनता पार्टीची कोअर कमिटीची बैठक होऊन त्यात महिला तालुका उपाध्यक्षपदी यावल तालुक्यातील टाकरखेडा गावच्या मालती खापरू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तालुका उपाध्यक्ष उमेश रवा फेगडे, तालुका सरचिटणीस विलास सदाशिव चौधरी, उज्जैनसिंग राजपूत यांनी ही निवड केली. या निवडीचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल व्यंकट चौधरी, यावल सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, सरपंच परीषद जिल्हाध्यक्ष पुरुजित चौधरी, जिल्हा परीषद शिक्षण समिती सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील, पंचायत समिती भाजपा गटनेता दीपक पाटील, नगरसेवक कुंदन फेंगडे, निलेश गडे, शहराध्यक्ष भाजपा, व्यंकटेश चौधरी, मीना चौधरी, कांचन फालक, अमोल हरीभाऊ जावळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. मालती खापरू पाटील या टाकरखेडा गावाच्या माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य माजी पोलीस पाटील खापरू पाटील यांच्या पत्नी व सैनिक विनोद पाटील व मनोज पाटील यांच्या आई आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !