भुसावळात भरधाव ट्रकच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू


भुसावळ : देवदर्शनासाठी मंदिरात गेलेल्या प्रौढ महिलेला भरधाव ट्रकने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अघात सोमवार, 31 रोजी सकाळी शहरातील गांधी पुतळ्याजवळ घडला. या अपघातात मीनाबाई मोहन अग्रवाल (55, मेथाजी मळा, भुसावळ) या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

क्रुर काळाने घातली झडप
महात्मा गांधी पुतळ्याजवळ असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाजवळच्या रस्त्यावरून मीनाबाई मोहन अग्रवाल (55) या मंदिरात दर्शनासाठी जात असताना क्रुर काळाने त्यांच्यावर झडप घातली. भरधाव ट्रक (जी.जे.21-0045) ने धडक दिल्याने मीनाबाई अग्रवाल यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परीसरातील नागरीकांनी अपघातस्थळी धाव घेतली. या घटनेने शोककळा पसरली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !