भुसावळ डीआरएम कार्यालयाबाहेर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसववा

रेल्वे कामगार सेनेचे रेल्वे महाप्रबंधकांना निवेदन


भुसावळ : भुसावळ डीआरएम कार्यालयाबाहेर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसववा, अशी मागणी भुसावळ दौर्‍यावर आलेल्या रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांच्याकडे रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने केली. तत्पूर्वी लाहोटी यांची भेट घेवून त्यांचा सत्कार केला तसेच ज्वलंत मागण्यांचे निवेदन देवून सखोल चर्चा करण्यात आली.

विविध मागण्यांवर सखोल चर्चा
जी.एम.कार्यालय मुंबईसारखा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बसवावा, रेल्वे दवाखाना भुसावळला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे, भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानक व रेल्वे आरक्षण कार्यालय येथील बोर्ड मराठीत लिहावेत, रेल्वे दवाखान्यात स्पेशालिस्ट डॉक्टरची भर्ती व उच्च श्रेणीची औषधे उपलब्ध करून द्यावीत, ट्रॅकमन यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा, त्यांच्या ऑर्डर निघाल्यावर त्यांना रीलीव न करणे, त्यांचे बदली व विनंती अर्ज फॉरवर्ड न करणे हे प्रकार तातडीने थांबवावेत, एमओएच वर्कशॉपसाठी स्पेशल रुग्णवाहिकेची व्यवस्था करावे, लिपिकांच्या रीक्त जागा तातडीने भराव्यात आदी मागण्यांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी भुसावळ मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, खजिनदार योगेश माळी, राजेश लखोटे, राकेश पाठक, विनोद वाघे, प्रकाश करसाळे, महेंद्र सोनवणे, विजय तायडे, रविंद थोरात, कमलाकर बाणाईत, अब्दुल अजीज, संजय जगनाथ चौधरी हे उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !