भुसावळ तालुक्यात पहिल्या चार तासात 9.9 टक्के मतदान
भुसावळ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असलीतरी पावसाच्या रीपरीपमुळे पहिल्या दोन तासात अत्यंत
संथगतीने मतदान सुरू असल्याचे दिसून आहे शिवाय अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया काहीशी खोळंबली होती मात्र लागलीच दुसरे मशीन लावण्यात आल्यानंतर मतदारांना दिलासा मिळाला. दरम्यान, सकाळी सात ते 9 दरम्यान पहिल्या दोन तासात 3.47 टक्के मतदान झाले तर सात ते 11 दरम्यान 9.9 टक्के मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात 11.9 टक्के पुरूष मतदारांनी तसेच 7.72 टक्के स्त्री मतदारांनी हक्क बजावला.
दोघा अपक्षांनी बजावला अधिकार
भुसावळ विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार डॉ.मधू राजेश मानवतकर व त्यांचे पती डॉ.राजेश मानवतकर यांनी भुसावळातील बियाणी स्कूलमध्ये मतदान केले तर दुसरे अपक्ष उमेदवार सतीश घुले यांनीदेखील सपत्नीक भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात मतदान केले.



भुसावळात तीन वेळा तर तालुक्यात तीन ठिकाणी ईव्हीएम पडले बंद
भुसावळ शहरातील म्युन्सीपल हायस्कूलमधील केंद्र क्रमांक 136 मध्ये आठ मतदारांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएममध्ये बंद पडल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली तर लागलीच ईव्हीएम मशीन बदलवण्यात आले तर काही वेळाने पुन्हा येथे ईव्हीएम बंद पडल्याने पुन्हा दुसरे ईव्हीएम लावण्यात आले. तांत्रिक बिघाड झाला असल्याचे झोनल अधिकारी रामदास मस्के यांनी यावेळी सांगितले. शहरातील तु.स.झोपे शाळेतील केंद्रातही ईव्हीएममध्येही 35 मतदारांनी हक्क बजावल्यानंतर ईव्हीएम बंद पडल्याने तेदेखील बदलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. भुसावळ तालुक्यातील अंजलसोंडे येथेदेखील ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण आली मात्र ती लागलीच सोडवण्यात आली तसेच तालुक्यातील कुर्हे पानाचे येथे बुथ क्रमांक 280 वरील केंद्रातील ईव्हीएम मशीन खराब झाल्यामुळे तब्बल एक तास 45 मिनिटे मतदारांना ताटकळत रहावे लागले. 8 वाजून 45 मिनिटांनी प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला.
भुसावळात पहिल्या दोन तासात अवघे 3.47 टक्के मतदान
भुसावळ शहर व तालुक्यात सकाळी सात ते नऊ दरम्यान पहिल्या दोन तासात अवघे 3.47 टक्के मतदान झाले. त्यात 4.55 टक्के पुरूष (7323) मतदार तसेच 2.32 टक्के स्त्री मतदारांनी (3400) हक्क बजावला.
माजी आमदारांनीही बजावला हक्क
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी खडका रोड भागातील उसामा उर्दू हायस्कूलमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.
