सोशल मिडीयावरून ओळख नंतर केला महिलेवर अत्याचार


पिंपरी : फेसबुकवरून महिलेशी ओळख करीत तरुणाने हॉटेलवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. विशेष म्हणजे महिलेचे फोटो, व्हडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. वाकड आणि आंबेगाव येथे जानेवारी 2021 ते 30 जानेवारी 2022 या कालावधीत अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली

हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा
आर्यन शेख (28, रा.वारणा, परभणी, सध्या रा. वाकड), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची फेसबुकवरून ओळख झाली. त्यानंतर फिर्यादी महिलेला वाकड आणि आंबेगाव येथील हॉटेलमध्ये नेले. महिलेला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पोलिस उपनिरीक्षक अजित काकडे तपास करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !