‘हिंदुस्थानी भाऊ’ ला अटक


मुंबई : विकास जयराम पाठक उर्फ ‘हिंदुस्थानी भाऊ’ याला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. त्याच्यासोबत इकरार खान वखार या 25 वर्षीय तरुणालाही अटक केलीय. ऑफलाईन परीक्षा रद्द करावी, यासाठी महाराष्ट्रातल्या विविध शहरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी 31 जानेवारीला आंदोलन केलं. हे आंदोलन ‘हिंदुस्थानी भाऊ’च्या आवाहानानंतर केल्याचं अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर ‘हिंदुस्थानी भाऊ’वर सर्वच स्तरातून टीका सुरू झाली. 1 फेब्रुवारी रोजी मुंबईतील धारावी पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, जमावबंदी आदेश, महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम यांसह विविध कलमांद्वारे गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर विकास जयराम पाठक (हिंदुस्थानी भाऊ) आणि इकरार खान वखार खान या दोघांना अटक करण्या आली.

विद्यार्थ्यांनी केले आंदोलन
‘हिंदुस्थानी भाऊ’ मुळे मुंबईसह नागपूर, औरंगाबादमध्ये
31 जानेवारीला मुंबईसह नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, पुणे याठिकाणी बोर्डाची ऑफलाईन परीक्षा रद्द करावी यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुंबईत धारावीत शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर नागपूरमध्ये बसची तोडफोड केल्याचंही समोर आलं. ‘हिंदुस्थानी भाऊ’च्या आवाहनानंतर ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यासाठी आम्ही आंदोलनात उतरलो, असं मुंबईत जमलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितलं तसेच ‘हिंदुस्थानी भाऊ’चाही यासंदर्भातील एक व्हीडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !