कर दात्यांना दिलासा नाहीच : कर रचना ‘जैसे थे’ : अर्थमंत्र्यांची घोषणा


नवी दिल्ली : अर्थसंकल्पात कर दात्यांना (Income Tax) दिलासा मिळेल, अशी आशा होती मात्र ती फोल ठरली आहे. या वर्षीही कर रचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण  (nirmala sitharaman 2022 budget)  यांनी केल्याने वर्षीही कर रचना समान असणार आहे.

असे आहेत करासाठी स्लॅब

2.5 लाख – कोणताही कर नाही

2.5 लाख ते 5 लाख – 5 टक्के कर

5 लाख ते 7.5 लाख – 10 टक्के

7.5 लाख ते 10 लाख – 15 टक्के

10 लाख ते 12.5 लाख – 20 टक्के कर

12.5 लाख ते 15 लाख – 25 टक्के

15 लाखांपेक्षा जास्त – 30 टक्के कर

चौकशी होणार बंद
करदात्यांकडून (Income Tax) फॉर्म भरताना एखादी चूक झाली तर त्यांची चौकशी होत होती. आता यापुढे ते बंद होणार असून त्यात गेल्या दोन वर्षातील चुकांची सुधारणा करण्याची संधी देण्यात येणार आहे. या संबंधी घोषणा करताना निर्मला सीतारमण  (nirmala sitharaman 2022 budget)  म्हणाल्या की, या आधी आयकर परतावा फाईल म्हणजे आयकर रिटर्न भरताना काही चूक झाली तर त्या करदात्याची चौकशी करण्यात येत होती. पण आता केंद्र सरकारने या करदात्यांवर पूर्ण विश्वास ठेवण्यासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या पुढे काही चुका झाल्या तर त्याची चौकशी होणार नाही. त्या चुकांमध्ये सुधारणा करण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे.

लाखो करदात्यांसाठी हा तर महत्वपूर्ण निर्णय
केंद्र सरकारचा हा निर्णय लाखो करदात्यांसाठी  (Income Tax) महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याच सोबत केंद्र सरकारने सहकारी सोसायट्यांसाठी असणारा किमान पर्यायी कर टॅक्स हा 18.5 टक्क्यांवरून 15 टक्के इतका करण्यात आला आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठीचा एनपीएस यावर्षीपासून समान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !