भुसावळात कॉपर केबलची चोरी : भंगार चालकांची होणार चौकशी


भुसावळ : शहरातील वरणगाव रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीमधील जय इंण्डस्ट्रीजधधून चोरट्यांनी 25 हजारांच्या रोकडसह सुमारे तीन लाखांची कॉपर केबल लांबवल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघड झाला होता. या प्रकरणी बााजरपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. चोरलेली कॉपर केबल भंगारमध्ये विक्री होईल, अशी शक्यता गृहीत धरून पोलिसांकडून आता शहरातील भंगार विक्रेत्यांसह त्यांच्या संपर्कातील लोकांची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

बंद सीसीटीव्ही पथ्थ्यावर
वरणगाव रस्त्यावर औद्योगिक वसाहतीत भुसावळातील नरेश काकुमल आठवाणी (56, नवजीवन सोसायटी, सिंधी कॉलनी, भुसावळ) यांची जय केबल इंण्डस्ट्रीज असून येथे कच्च्या मालावर प्रक्रिया करून केबल तयार केली जाते. शुक्रवारच्या कामानंतर शनिवारी कर्मचार्‍यांना सुटी दिल्यानंतर रविवारी फॅक्टरीत चोरी उघड झाली होती त्यामुळे शनिवारीच चोरट्यांनी चोरी केल्याने त्या दृष्टीने या परीसरातील कार्यान्वीत सीसीटीव्हींची पाहणी करण्यात येत असून कंपनीत सीसीटीव्ही बंद असल्याने त्यात चोरट्यांची छबी कैद होवू शकली नसल्याचे माहिती सूत्रांनी दिली. चोरट्यांनी 25 हजारांची रोकड मिळून दोन लाख 92 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असून शहरातील प्रमुख भंगार विक्रेत्यांची पोलिसांकडून आता चौकशी होणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !