भुसावळ पालिकेतील कोरोना योद्ध्यांचा सत्कार


भुसावळ : भुसावळ नगरपालिकेतील कोविड काळामध्ये काम केलेल्या सर्व आशा वर्कर, परीचारीका, अधिपरीचारीका, डाटा एंट्री ऑपरेटर, औषधी निर्माता, शिपाई आदींचा पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, उपमुख्य अधिकारी ढाके यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

मुख्याधिकार्‍यांनी केले कामाचे कौतुक
या कार्यक्रमाच्या वेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी कोरोना काळात आरोग्य विभागातील सर्व कर्मचार्‍यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भुसावळ शहरातील सर्व रुग्णांना जास्तीत-जास्त उपचार, दवाखान्यातील भरती प्रक्रिया तसेच घरी घ्यावयाची काळजी, कोविड लसीकरण इत्यादींबाबत अत्यंत चोखपणे सेवा देण्याचा प्रयत्न केल्याने या कामाचे विशेष कौतुक केले. भविष्यात देखील या सारख्या कोणत्याही महामारीची पुन्हा लाट आल्यास आपली शारीरीक क्षमता योग्य ठेवण्यासाठी कोविड लसीकरणाचे बूस्टर डोस घेण्यासाठी चे महत्त्व पटवून दिले. यावेळी नगरपालिकेतील सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !