शिस्तभंगचा ठपका : मुक्ताईनगर पं. स.तील विस्तार अधिकारी व ग्रामसेवक निलंबित


मुक्ताईनगर : प्रशासकीय कामकाजात गैरवर्तन, अनियमितता आणि सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून पदभार असतांना परस्पर आदेश पारीत करून शिस्तभंग केल्याप्रकरणी येथील पंचायत समिती ग्राम पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी राजकुमार जैन यांना तसेच कुर्‍हा येथील ग्रामसेवक विनायक पाटील या दोघांना गटविकास अधिकार्‍यांनी लेखी आदेशद्वारे निलंबित केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.आर.नागटीळक यांनी सोमवारी दुपारी निलंबनाचे आदेश काढले आहे. निलंबन काळात राजकुमार जैन यांचे मुख्यालयात पंचायत समिती मुक्ताईनगर येथेच रहाण्याचे आदेश देण्यात आले आहे.

कामकाजात हलगर्जीपणाचा ठपका
राजकुमार जैन हे येथील पंचायत समितीत विस्तार अधिकारी (ग्राप) यापदावर कार्यरत असतांना प्रशासकीय कामकाजात गैरवर्तवणुक, कामकाजात अनियमितता तसेच कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा केल्यामुळे प्रशासकीय कामकाजास अडचण निर्माण केली असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडे सहाय्यक गटविकास अधिकारी पदाचा पदभार असतांना त्यांनी परस्पर आदेश पारीत करून सेवा शर्तीचे उल्लंघण केले. तसेच पं.स. अंतर्गत विविध योजनांवर नियंत्रण अधिकारी म्हणून आपली जवाबदारी योग्यपणे पार पाडली नाही, असा ठपका त्यांच्या निलंबन आदेशात ठेवण्यात आला आहे. तत्पूर्वी जैन यांची खाते चौकशी झाली. त्यात विविध नोंदी घेण्यात येऊन अहवाल जि.प.प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता.

चौकशी अहवालानंतर काढले आदेश
चौकशी अहवालावरून जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. प.) दिगंबर लोखंडे यांनी हे आदेश पारीत केले. हे आदेश येथे प्राप्त होताच खळबळ उडाली आहे. सोमवार, 31 रोजी गटविकास अधिकारी नागटीळक यांनी जैन यांच्या निलंबनाचे आदेश दिले. या निलंबन कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. वडोदा ग्रामपंचायतीच्या ग्रामविस्तार अधिकार्‍याने कोरोना बाधित सुटीवर असतांना ई टेंडर काढल्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई ची टांगती तलवार असल्याची चर्चा असतांना आज ग्रामविस्तार अधिकारी यांची विकेट पडली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !