सराईत गुन्हेगाराची अमळनेरात पोलिसांनी काढली धिंड


अमळनेर : रस्त्यावर नागरीकांना आडवून बेदम मारहाण करून बळजबरीने लुटमार करणार्‍या सराईत गुन्हेगारासह एकाला अमळनेर पोलिसांनी (Amalner Police) अटक केल्यानंतर त्यांची भर रस्त्यातून पोलिसांनी धिंड काढल्याने गुन्हेगारांचे ढाबे दणाणले. सराईत गुन्हेगार शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख (23, रा.संविधान चौक, अमळनेर)  (Shubham Manoj Deshmukh) आणि राहुल किशोर वानखेडे (लोण चरम, ता. अमळनेर) (Rahul Kishor Wankhede) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.

गुन्हेगारांच्या गोटात खळबळ
अमळनेर शहरातील सराईत गुन्हेगार शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद (Shubham Manoj Deshmukh) हा अमळनेर, चाळीसगाव शहरात साथीदारांच्या मदतीने व्यक्तींना हेरून बेदम मारहाण करून दरोडा टाकणे, रस्ता लुट करीत होता. संशयीतांविरोधात वेगवेगळ्या प्रकारचे 23 गंभीर गुन्हे दाखल आहे. दरम्यान, 2 फेब्रुवारी रोजी संशयीत आरोपी शुभम देशमुख हा अमळनेर शहरात पत्नी व सासुकडे आल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, पोहेकॉ सुनिल हटकर, पोलिस नाईक दीपक माळी, मिलिंद भामरे, सुर्यकांत साळुंखे, रवींद्र पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, गणेश पाटील, रोहिदास आगोणे, सागर साळुंखे यांनी शहरातील गलवाडे रोड प्रताप मिल (Galwade Road, Pratap Mill) येथे सापळा टाकून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.






पळताना आरोपी जखमी
दरम्यान, पथक आल्यानंतर संशयीत आरोपी शुभम देशमुख  (Shubham Manoj Deshmukh) हा पोलिसांना पाहून भिंतीवरून उडी घेवून पळण्याचा प्रयत्नात असतानाच त्याच्या पायाला दुखापत झाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे त्याचा साथीदार राहूल किशोर वानखेडे याला देखील त्याच्या राहत्या घरातून दुसर्‍या पथकाने अटक केली. यापुर्वी देखील सराईत गुन्हेगार शुभम  (Shubham Manoj Deshmukh) हा पोलिसांच्या तावडीतून सुटू पसार झाला होता त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार बेड्या ठोकण्यात आल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !