धुळ्यात वृद्धाची गळफास घेत आत्महत्या
धुळे : शहरातील अभय कॉलनी येथील वृध्दाने राहत्या घरी गळफास लावुन आत्महत्या केली. अभय कॉलनी येथील वृध्द भीका सोनू चौधरी (86 ) यांनी राहत्या घरी गळफास लावुन घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने हिरे रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू करण्यापुर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आझाद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.

