शेततळ्यात पडल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू


चाळीसगाव : तालुक्यातील शिंदी येथे 16 वर्षीय मुलाचा शेततळ्यात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. 2 रोजी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. संतोष सुनील रावते असे मृत बालकाचे नाव आहे. तो गुरे चारण्यासाठी गेला होता. संतोष रावते हा बालक 2 रोजी सायंकाळी शेततळ्यात पाय घसरून पडला. ही घटना उघड होताच त्याला काशिनाथ सोनवणे यांनी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृताच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परीवार आहे. हवालदार दीपक ठाकूर हे तपास करत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !