प्रेरणा एक्स्प्रेसमधून महिलेची बॅग लांबवली


भुसावळ : प्रेरणा एक्स्प्रेसमधून महिलेची चोरट्याने बॅग लांबवली. लोहमार्ग पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पूजा हिरामण बारापात्रे (नागपूर) या प्रेरणा एक्झप्रेसने अहमदाबाद ते नागपूर असा एस- 3 मधील सीट क्रमांक 33 वरून प्रवास करीत असताना झोपेचा फायदा घेत चोरट्याने त्यांची बॅग लांबवली. बॅगेत एक मोबाईल आणि 600 रुपये रोख असा मुद्देमाल होता. हा गुन्हा सुरत लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !