क्रौर्याची परीसीमा : सात वर्षीय बालिकेवर अत्याचार : व्हिडिओ केला व्हायरल


इंदूर : सात वर्षीय बालिकेवर नराधमाने अत्याचार केल्याची घटना इंदौर शहरात उघडकीस आली आहे. विशेष आरोपीच्या या कृत्याचा व्हिडीओ कोणीतरी व्हायरल केला असून पोलिसांनी आरोपी विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

अत्याचार होत असताना अज्ञाताने बनवला व्हिडिओ
पीडीता इंदूरच्या मुसाखेडी भागातील शांतीनगरमध्ये राहते. तिला आई नाही. आजी आणि वडिलांसोबत ती राहते. आजी कामावर गेली होती आणि वडीलही बाहेर गेले होते. दरम्यान, आरोपी रवीने मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा करताच तिचे तोंड दाबले. शेजारी राहणार्‍या एका तरुणाने व्हिडिओ बनवला. त्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी परीसरात दारूचे वितरण करत असल्याचे सांगण्यात येत आहे. आजी आणि वडिलांच्या अनुपस्थितीत तो अनेकदा मुलीच्या घरी जात असल्याची माहिती समोर आली आहे.

व्हिडिओ बनवणार्‍याचा पोलिसांकडून शोध
पोलिस आरोपीच्या घराचीही माहिती गोळा करत आहेत. एका निरपराधवर बलात्काराच्या प्रयत्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचेही समोर येत आहे. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. अशा परीस्थितीत व्हिडिओ व्हायरल करणार्‍यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !