अनैतिक संबंधास नकार देणार्या विवाहितेचा गळा आवळून खून : या शहरातील घटना
येरवडा : विवाहितेने अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने विवाहितेचा खून करण्यात आला व या घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे. ही घटना रविवारी रात्री लोहगाव येथे घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी आरोपी गुलाम मोहम्मद शेख (30, रा.पठारे वस्ती संत नगर लोहगाव, मूळचा रा. बिहार) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
गळा आवळून केला खून
लोहगाव येथील मोझेआळी परीसरातील आरोपी गुलाम हा महिलेच्या घरात भाड्याने राहण्यास होता. दरम्यानच्या काळात त्यांचे प्रेम संबंध निर्माण झाले होते. ही बाब महिलेच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी आरोपीला घर रीकामे करण्यास सांगितले. रविवारी दुपारी महिला घरात एकटीच असताना गुलाम याने घरात येऊन तिचा बाथरूम मध्ये गळा आवळून खून केला.

आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा
खुनाच्या गुन्ह्यात नंतर घराला कुलूप लावून तो निघून गेला. महिलेचा पती व मुले कामावरून घरी आल्यानंतर घराला कुलूप असल्याचे पाहिले. तिला संपर्क केला असता त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे रात्री उशिरा घराचा दरवाजा तोडल्यानंतर सदर महिलेचा मृतदेह बाथरूम मध्ये आढळून आला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गुलाम शेख याच्याविरुद्ध अनैतिक संबंधांना नकार दिल्यामुळे गळा आवळून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विमानतळ पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आलेले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप करीत आहेत.
