भुसावळात स्व.निखील खडसे स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेला थाटात प्रारंभ
भुसावळ : शहरातील आरपीडी रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बुधवारपासून स्व.निखील खडसे स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. अनिकेत पाटील व मित्र परीवारातर्फे या आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत राज्या-परराज्यातील 32 संघ सहभागी झाले आहेत. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेला टॉस करून प्रारंभ करण्यात आला.
या मान्यवरांची उपस्थिती
स्पर्धेसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश नेमाडे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक गजानन पडघण, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे, आयोजक अनिकेत पाटील, अॅड.बोधराज चौधरी, अमोल इंगळे, किरण कोलते, सुनील महाजन, देवा वाणी, दिनेश नेमाडे, बुटासिंग चितोडीया आदींची उपस्थिती होती.
समारोपास मो.अझरुद्दीन उपस्थित राहणार
भव्य क्रिकेट स्पर्धा 9 ते 12 दरम्यान होणार असून 13 रोजी स्पर्धेचा समारोप होईल तर या कार्यक्रमास भारतीय संघाचे माजी कप्तान मो.अझरूद्दीन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, प्रत्येक दिवशी सात मॅचेस होतील व एक मॅच सहा ओव्हरची असेल तर 13 रोजी सकाळी 10 वाजता सेमी फायनल व फायनल सामना होईल. हा सामना आठ ओव्हर (षटकांचा) असेल तर दुपारी तीन वाजता विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येईल.


