निंभोरा पोलिस ठाण्यात सहा.निरीक्षक गणेश धुमाळ रूजू
खिर्डी : निंभोरा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांची पोलिस निरीक्षकपदी महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे पदोन्नतीवर बदली झाल्यानंतर रीक्त जागी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहा.निरीक्षक गणेश धुमाळ यांची बदली करण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळी त्यांनी पदभार स्वीकारला. पोलिस कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी पुष्गुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले. तक्रारदारांना न्याय देण्यासह पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


