भुसावळात उद्या शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक


भुसावळ : शिवसेना उपनेते व पालकमंत्री गुलाबरावजी पाटील हे शनिवार, 12 फेब्रुवारी रोजी शहरात विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी येत आहेत. भुसावळ विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश राणे यांनी संघटना बांधणीसाठी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेची शुक्रवार, 11 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता शासकीय विश्राम गृहात महत्वाची बैठक होत आहे. भुसावळ शिवसेना तसेच सर्व अंगीकृत संघटनेच्या आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !