जळगावच्या तांबापुर्यात अल्पवयीन मुलावर चौघांचा हल्ला
जळगाव : शहरातील तांबापुरा भागात एका अल्पवयीन मुलावर चौघांनी हल्ला चढविल्याने तो जखमी झाला. शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शादाब गफार मन्यार (16) या अल्पवयीन मुलास समीर व साहील यांच्यासह चौघांनी घरातून बाहेर बोलावून त्याला जबर मारहाण केली. यात तो जखमी झाला. या संदर्भात एमआयडीसी पोलिस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली असून रात्री उशीरापर्यंत याबाबत गुन्हो नोंदविण्याचे काम सुरू होते.
जखमीवर रुग्णालयात उपचार
या हल्ल्यात जखमी झालेल्या शादाब मन्यार याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.





