भीषण अपघातात तिघा मित्रांचा मृत्यू


 

अहमदनगर : ऊसाच्या टेलरला पाठीमागून कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात (Car Accident ) तीन मित्रांचा मृत्यू झाला. हा अपघात जिल्ह्यातील श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात घटना घडला. मित्राला सोडविण्यासाठी जात असताना क्रुर काळाने घाला घातला. राहुल सुरेश आळेकर (22), केशव सायकर (22) व आकाश रावसाहेब खेतमाळीस (18) अशी ठार झालेल्या मित्रांची नावे आहेत.

उसाला ट्रेलर धडकला
आकाश आणि राहुल हे केशव सायकरला सोडविण्यासाठी काष्टीला (Kashti) जात असताना अपघात झाला. तिनही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने श्रीगोंदा काष्टीत शोककळा पसरली आहे. मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. दरम्यान, अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एका जणाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी अपघातावेळी तातडीनं बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आलं नाही. या अपघातात राहुल आळेकर, केशव रायकर, आकाश खेतमाळीस या तिघांचा मृत्यू झाल्यानं गावकर्‍यांना धक्का बसला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !