जळगाव जिल्हा रुग्णालयासमोरून एकाची दुचाकी लंपास
जळगाव : शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या गेटजवळून एकाची 10 हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा
धरणगाव शहरातील रहिवासी भिकन एकनाथ मराठे (45) हे दवाखान्याच्या कामानिमित्ताने शुक्रवार, 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांची (एम.एच. 19 डी.सी. 7715) या क्रमांकाच्या दुचाकीने जिल्हा रुग्णालयात आले होते. रुग्णालयाच्या गेटजवळ त्यांनी त्यांची दुचाकी उभी केली. दुपारी एक वाजता काम आटोपून बाहेर आल्यावर रुग्णालयाच्या गेटजवळ लावलेली त्यांची दुचाकी दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने भिकन मराठे यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार तुषार जावरे करीत आहेत.





