17 दुचाकींसह चोरटा शेगावातील दुचाकी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
शेगाव : बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने ‘शेगाव’ शहरातून दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड केली आहे. संशयीताकडून तब्बल चोरीच्या 17 दुचाकी जप्त करण्यात आल्या.
गोपनीय माहितीवरून कामगिरणी
अपर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला शेगाव शहर व परीसरातून चोरीला गेलेल्या दुचाकी चोरट्यांची टोळी ‘शेगाव’ येथीलच असल्याची गुप्त व खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाच्या पथकाने शुक्रवार, ि1 फेब्रुवारी रोजी सकाळपासून सापळा रचून शेगाव शहर व परीसरातून एकूण सतरा दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

आणखी चोर्या उघडकीस येण्याची शक्यता
या चोरीच्या प्रकरणातील म्होरक्या व इतर चोरट्यांना ताब्यात घेऊन आणखी कुठे आणि किती चोरीच्या चोरीच्या घटना घडविण्यात आल्या याबाबत विचारपूस करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणावरून चोरीच्या 17 विना क्रमाांकच्या दुचाकी जप्त करून शेगाव पोलिस स्टेशन आवारात जमा केल्या. अजूनही चोरी झालेल्या काही दुचाकी मिळण्याची शक्यता आहे.
