नाशिकच्या प्रियकराचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू
नाशिक : आई-वडिलांनी निश्चित केलेल्या मुलाशी लग्न मोडल्याच्या रागातून प्रेयसीने कुटुंबीयांच्या मदतीने प्रियकराला शुक्रवार, 11 फेब्रुवारी रोजी पेट्रोल ओतून जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. यात गंभीर भाजलेला प्रियकर गोरख बच्छाव याचा रविवारी रात्री 10 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. देवळा पोलिस ठाण्यात या प्रकरणी संशयीत प्रेयसी कल्याणी, तिचे वडील गोकुळ सोनवणे आणि तिच्या दोन भावांसह नातेवाइकांवर खुनाच्या गुन्ह्याचे वाढीव कलम लावण्यात आले.
