लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे अखेर बेशुद्धावस्थेत सापडले


खंडाळा : लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे (Police Inspector Sangram Tate) हे तेरा दिवसानंतर खंडाळा येथे महामार्गाच्या कडेला आढळून आले असून जालना येथून ते बेपत्ता झाल्याने त्यांचा शोध सुरू होता. खंडाळा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन जालना पोलिसांकडे सुपूर्द केले. बेपत्ता अधिकार्‍याचा शोध लागल्याने कुटुंबियांसह पोलिसांचा जीव भांड्यांत पडला. दरम्यान, 20 दिवसांपूर्वीच ताटे यांची कोकणात बदली (Transfer) झाल्याची माहिती आहे.

खंडाळा येथून झाले होते बेपत्ता
पोलिस निरीक्षक संग्राम ताटे (Police Inspector Sangram Tate) हे रविवार, 3 रोजी खंडाळा येथील जुना टोलनाका परिसरात चक्कर येऊन पडलेल्या अवस्थेत होते. महामार्गालगतच्या एका हॉटेल कामगाराने त्यांना उठवून बसविले. त्यानंतर त्यांनी कामगाराच्या फोनवरून नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईकांनी खंडाळा येथील स्थानिक मित्रांना फोन करून कल्पना दिली. दरम्यान, खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी संग्राम ताटे यांना ताब्यात घेतले.

अखेर खंडाळ्यात थांबला शोध
सायंकाळी त्यांचे नातेवाईक खंडाळ्यात पोहचले. तसेच जालना येथील कदीम पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश टाप हे सुद्धा पोहचले. त्यानंतर खंडाळा पोलिसांनी त्यांना जालना पोलिसांकडे सुखरुप सुपूर्त केले. संग्राम ताटे हे तेरा दिवसांपूर्वी घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाले होते. त्यानंतर ते सांगली (Sangali) येथे सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCCT) दिसून आले होते. त्यामुळे सांगली पोलीसही त्यांचा शोध घेत होते. अखेर ते खंडाळ्यात आढळून आले.

सलग तेरा दिवस चालत राहिले
संग्राम ताटे (Police Inspector Sangram Tate) हे सलग तेरा दिवस चालत राहीले. कोणता तरी मानसिक दबाव असल्यासारखे ते दिसून येत होते. सततच्या चालण्याने त्यांच्या पायाला जखमाही झाल्या होत्या. खंडाळ्यातील स्थानिक लोकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याची विनंती केली पण त्यांनी ती नाकारली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !