नववीत शिकणार्या विद्यार्थिनीची शिक्षकाने केली हत्या
कोटा : नववीत शिकणार्या 15 वर्षीय विद्यार्थिनीची शिक्षकाने हत्या केल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. एका शिकवणी घेणार्या शिक्षकाने रामपुरा कोतवाली पोलिस स्टेशन परीसरात विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तिची हत्या केली. मात्र, पोलीस याला दुजोरा देत नाहीत. आरोपी शिक्षकाला अटक न केल्याने संतप्त झालेल्या शहरातील अनेक व्यावसायिकांनी आज आपली दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक आणि कामगार संघटनेची मागणी आहे की मारेकरी शिकवणी शिक्षक गौरव जैनला तात्काळ अटक करण्यात यावी, ज्याने मुलीवर निर्दयीपणे बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि अयशस्वी होऊन तिची हत्या केली.
बाजारपेठ बंद ठेवून केला निषेध
आरोपी ट्युशन शिक्षकाला अटक न केल्याने आज अनेक बाजारपेठा बंद ठेवून निषेध व्यक्त केला. त्याचवेळी रामपुरा कोतवालीच्या बाहेर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी व्यापारी महासंघ रात्रीपासून धरणे धरून बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोटा शहराचे एसपी केसर सिंह शेखावत या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी डझनहून अधिक टीम तयार केल्या आहेत, जे आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आरोपीच्या पलायनाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये तो उत्तरी बायपासवरील कोटा शहरातील नयापुरा, रंगपूर आणि भडाना या भागात गेला आहे. मात्र, आता या संदर्भात पोलीस तपास करत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.





