गुरांची अवैध वाहतूक रोखली : 12 गायींची सुटका

आयशर वाहन शिरपूर तालुका पोलिसांनी केले जप्त : चालकाविरोधात गुन्हा


शिरपूर : कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची अवैधपणे वाहतुक करणार्‍या आयशर वाहनावर चिलारे ते लाकड्या हनुमान रस्त्यावर तालुका पोलिसांनी तालुका पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करीत 12 गायींची सुटका केली. ही कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बुधवार, 16 फेब्रुवारी रोजी पहाटे करण्यात आली. कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची अवैधपणे वाहतुक करणार्‍या एकाच आयशर वाहनावर तालुका पोलिसांनी 20 दिवसात दुसर्‍यांना 16 फेब्रुवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात मुकेश बी पावरा यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.य

चालक अंधारात पसार
16 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री तालुक्यातील चिलारे लाकड्या हनुमान दरम्यान रस्तावर दुसर्‍यांदा एम.पी.09 एल. 8203 आयशर वाहनावर कारवाई करण्यात आली तर चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला. चालक वाहन सोडून पसार झाल्याने पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता वाहनात 12 गायींची निदर्यतेने वाहतूक होत असल्याचे दिसून आले. दोन लाख 40 हजार किंमतीच्या 12 गायींची सुटका करीत 15 लाखांचा आशयर मिळून 17 लाख 40 हजार किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई वरीरष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाविस्कर, चालक हवालदार र्सइद शेख आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !