Union Minister Narayan Rane नारायण राणेंचा खळबळजनक आरोप : सुशांग सिंग व दिशा सलियनची हत्याच
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी पत्रकार परीषदेत ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप करतांना काही धक्कादायक दावे देखील केल्याचे खळबळ उडाली आहे. दिशा सलियन आणि सुशांतसिंह राजपूत यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केला आहे.
म्हणून हत्या करून त्यांना शांत करण्यात आले
याबाबत नारायण राणे (Union Minister Narayan Rane) म्हणाले की, ‘दिशा सलियनवर बलात्कार होत असताना त्या फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक पहारा देत होते ? 8 जूनला दिशा सलियनची (Disha Salian) हत्या झाली होती. जेव्हा सुशांतला या सर्व प्रकरणाविषयी कळले तेव्हा त्यानं आवाज उठवण्याचं ठरवलं. पण म्हणूनच त्याचीही हत्या करून त्याला शांत करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी दिशा सलियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणाविषयी आणखी नवे खुलासे केले.


सरकारला थेट दिले आव्हान
दिशा सलियन मृत्यू प्रकरणाचा तपास पोलिसांकडून बंद करण्यात आल्यामुळे आता नारायण राणे यांनी थेट ठाकरे सरकारला आव्हान देत म्हटलं आहे की,”आम्ही ही केस पुन्हा उभी करू, कोर्टात न्याय मागू पण शांत बसणार नाही. ठाकरे सरकारला दिशा सलियन, सुशांतसिंह राजपुत संदर्भातल्या अनेत अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यावेच लागेल”, असेही केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी म्हटलं आहे.
दिशा आत्महत्या का करेल?
दिशा सालियनची (Disha Salian) बलात्कार करून हत्या (rape and murder) झाली, पण आत्महत्या (suside) झाल्याचे दाखवण्यात आले. दिशा आत्महत्या का करेल? असे म्हणत राणे यांनी, दिशा सालियानचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट का आला नाही? दिशा सालियान ज्या इमारतीत राहायची तेथील रजिस्टरची पानं का फाडली गेली? असे प्रश्न उपस्थित केले. एवढेच नाही तर, जेव्हा सुशातंसिंह राजपूतला हे प्रकरण समजले, तेव्हा मी यांना सोडणार नाही, असे सुशात म्हणाला होता. यानंतर, त्याच्या घरात बाचाबाची झाली. त्यातून सुशांतसिंह राजपूत याचीही हत्या झाली, असा दावाही नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी यावेळी केला.
