एकाच कुटुंबातील पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न : धुळ्यातील घटनेने खळबळ
धुळे : एकाच कुटुंबातील सर्वच सदस्यांनी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा सामूहिक प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. धुळे
शहराजवळील अवधानमध्ये ही घटना सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. गणेश गोपाळ (36), त्यांची पत्नी सविता (34), मुलगी जयश्री (14), मुलगा गोविंद (12) व भरत पारधी (24) अशी विष प्राशन करणार्यांची नावे असून भरतची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. आत्महत्या करण्याचा प्रयत्न या कुटुंबाने का केला? याचे ठोस कारण कळू शकले नाही.

मोहाडी पोलिसांची घटनास्थळी धाव
एकाच कुटुंबातील सदस्यांनी विष प्राशन केल्याची माहिती कळताच मोहाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहायक उपनिरीक्षक अशोक पायमोडे, प्रकाश जाधव व पथकाने धाव घेत माहिती जाणून घेतली. दरम्यान, विष प्राशन केलेल्या एकाच कुटुंबातील सदस्यांवर धुळ्यातील हिरे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

