अल्पवयीन गतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार : या जिल्यातील संतापजनक घटना


सातारा : राज्यात महिलांसह मुलींवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असल्याने समाजमन संतप्त झाले आहे. सातारा जिल्ह्यातही अशीच एक घटना समोर आली असून नराधमांनी अल्पवयीन मतिमंद मुलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने सामूहिक अत्याचार केला. विशेष म्हणजे या कृत्यात एका महिलेचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे ही संतापजनक घटना घडली. नऊ आरोपींना पोलिसांनी या प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.

आठ नराधमांनी केला अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने गावातीलच एका अल्पवयीन मुलगी मतिमंद असल्याचा फायदा घेत 27 जानेवारी 2022 ते 18 फेब्रुवारी 2022 दरम्यान बाहेर फिरायला जाण्याचे, बाहेर खाऊपिऊ घालण्याचे तसेच पैसे देण्याचे आमिष दाखवून तिला बाहेर घेऊन जात होती. तिने अल्पवयीन मुलीला पाटण व आजूबाजूच्या परीसरातील लोकांची ओळख करून देऊन त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. पाटण व आजूबाजूच्या परीसरातील आठ लोकांनी या अल्पवयीन व मतिमंद मुलीवर वेळोवेळी व वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पाटण पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचार व बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 17 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील सर्व नऊ आरोपींची नावे निष्पन्न करून त्यांचा शोध घेऊन त्यांना बारा तासांत अटक करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !