छत्रपती शिवरायांबद्दल बेताल वक्तव्याचा निषेध : वरणगावात राज्यपालांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
वरणगाव : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता क्रांतीसूर्य महात्मा फुले-सावित्रीआई फुले यांच्याबद्दल अतिशय हीन दर्जाचे बेताल वक्तव्य केल्यानंतर गुरुवारी बसस्थानक चौकात, राज्यपाल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध करण्यात करण्यात आला. प्रसंगी कोशारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले व वरणगाव पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
वरणगाव पोलिसांना दिले निवेदन
माळी समाज, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि समाजबांधव यांच्या वतीने राज्यपाल कोशारी यांच्या प्रतिमेला जोडे मार आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करून निषेध करण्यात आली. वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ, प्रशांत दळवी यांना निवेदन देण्यात आले.


वक्तव्याचा केला निषेध
औरंगाबाद येथे अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा एकेरी शब्दात उल्लेख करून तमाम मराठी माणसांच्या अस्मिता आणि भावना दुखावण्याचे काम राज्यपालांनी केले. त्यानंतर राज्यपाल कोशारी यांनी आपल्या अकलेचे तारे तोडून थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आई सावित्री फुले यांच्याबद्दल अतिशय हीन दर्जाचे बेताल वक्तव्य केले. या वक्तव्याचा निषेध करीत भगतसिंग कोशारी यांनी पदाचा राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली. राज्यपालांनी जाहीर माफी मागावी अन्यथा संपूर्ण राज्यात लोकशाही पद्धतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी महात्मा फुले समता परीषदेचे भुसावळ तालुकाध्यक्ष संतोष बळीराम माळी, माळी समाज अध्यक्ष संजय रामा माळी, माळी समाज महासंघ तालुकाध्यक्ष विजय मधुकर माळी, माजी नगरसेवक बबलू निवृत्ती माळी, युवक तालुका अध्यक्ष निलेश निवृत्ती माळी, शहराध्यक्ष सचिन अशोक माळी, पंच गोविंदा नामदेव माळी, सुनील प्रभाकर माळी, युवा संघटनेचे अध्यक्ष दिपक प्रकाश माळी, सेक्रेटरी नाना प्रभाकर माळी, संदीप ज्ञानेश्वर माळी, शिरू गणपत माळी, नरेंद्र विश्वनाथ माळी, बाळू दगडू माळी, संकेत प्रवीण माळी, अतुल अशोक माळी, पप्पू संदीप माळी, रुपेश रविंद्र माळी, मयुर यशवंत माळी, कृष्ण नारायण माळी, गंभीर शंकर माळी, लखन रामदास माळी, निलेश विलास माळी, राजू अरुण माळी, नितीन सुभाष माळी, कैलास दत्तू माळी, सुरेंद्र सदाशिव थोरात, ज्ञानेश्वर नामदेव चौधरी, राहुल महिपतराव तायडे, किरण गुणवंत माळी, बाळा माळी भुषण माळी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
