धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप : या कारणास्तव केली ईडीकडे तक्रार
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी धुळे शहरातील माजी आमदार अनिल गोटे (ex mla anil gote) यांनी ईडीकडे तक्रारीद्वारे केली आहे. इक्बाल मिर्ची या कुख्यात गुंडाकडून देणगी स्वीकारल्या प्रकरणी ही तक्रार करण्यात आली आहे.
दाऊद कंपनीकडून देणगीचा आरोप
महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर तपास यंत्रणांनी कारवाई केली. ईडीने नुकतीच नवाब मलिकांना (ncp leader nawab malik) अटक केली. त्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. संजय राऊतांनी देखील काही पुराव्यांसह पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे (ex mla anil gote) यांनी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारला दाऊद संबंधित कंपनीकडून देणगी मिळाल्याचा आरोप केला आहे.


माजी आमदार गोटेंनी केले गंभीर आरोप
“कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात असलेला देशद्रोही व 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी इक्बाल मिरची आहे. त्याच्या संबंधित असलेल्या राकेश वाधवान यांच्या बँक खात्यातून फडणवीस सरकारला 2014 ते 15 मध्ये 10 कोटी रुपये देणगी देण्यात आली होती. राकेश वाधवान पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून सध्या तुरुंगात आहे”, असे आरोप अनिल गोटे यांनी केले आहे. खंडणी गोळा केल्याप्रकरणी अनिल गोटे (anil gote) यांनी मुंबईतील ईडी कार्यालयात तक्रार नोंदवल्याची माहिती आहे. याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच देवेंद्र फडणवीसांची (devendra fadanvis) चौकशी करण्याची मागणी गोटेंनी केली आहे.
