अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा
तत्पूर्वी त्यांनी शरद पवार यांचे घेतले आशीर्वाद
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत तब्बल 30 वर्षांपासून अबाधित माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची सत्ता उलथवून विजयी झालेले राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार तसेच सेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली व शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन मातोश्रीवर जात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास दिला. प्रसंगी उपनेते गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र मिरलेकर, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रप्रमुख विनोद चव्हाण यांची उपस्थिती होती. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या पाठिंब्याने शिवसेनेचे विधिमंडळातील संख्याबळ 63 वर पोहोचले आहे.
