भीषण अपघातात पितापुत्र, शालक-भावजयी जागीच ठार


Malegaon Raod Accidant मालेगाव : अपघातांची मालिका थांबायला तयार नाही. चर्चगेट व निळगव्हाण फाट्यावर मंगळवारी पहाटे चार तासांच्या अंतरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चौधा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मालेगाव तालुक्यातील टिपे येथील बापू शिवा मानोर (55) व पप्पू बापू मानोर (25) या पितापुत्रांचा आणि दुसर्‍या अपघातात दिलीप रघुनाथ येवले (60) व उमेश मधुकर नेरकर (50) या शालक व मेहुणे यांचा मृत्यू झाला.

गांधीधाम एक्स्प्रेसमधून पाच लाखांचा ऐवज लंपास

अपघातांची मालिका कायम
टिपे येथील बापू मानोर व पप्पू मानोर हे पितापुत्र दुचाकीने सकाळी आठ वाजता नामपूरच्या दिशेने जात होते. निळगव्हाण शिवारात म्हशींची वाहतूक करणार्‍या आयशर टेम्पोने (एक्स 6686) दुचाकीला समोरून धडक दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !