भरधाव दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळल्याने सावखेडासीमच्या तरुणाचा मृत्यू


यावल : तालुक्यातील हरीपुरा येथे यात्रा बघण्यासाठी जाताना भरधाव दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री घडला. तनवीर अरमान तडवी (20, रा.सावखेडासीम) असे मयत तरुणाचे नाव आहे. रस्त्यात नादुरूस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीस्वारांनी मागून धडक दिल्याने हा अपघात घडला.

नादुरुस्त ट्रॅक्टरवर आदळली दुचाकी
सावखेडासीम येथील सलीम तडवी (25) व तनवीर अरमान तडवी (20) हे दोघे तरुण बुधवारी दुचाकी (एम.एच.19 बी.जे.7624) व्दारे हरीपुरा येथील यात्रेत जात होते. सावखेडासीम ते मोहराळा या रस्त्यात नामदेव गुरुजी यांच्या शेताजवळ नायगाव येथील ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19-9106) हे नादुरूस्त अवस्थेत रस्त्याच्या मध्यभागी ट्रॉलीसह उभे होते व त्याचवेळी भरधाव दुचाकीवरील सलीम तडवी हा रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला त्याने बचावासाठी दुचाकी वळवत ब्रेक लावला व त्याचवेळी बेसावध बसलेला तनवीर हा थेट ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आदळला. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. या प्रकरणी यावल पोलिसांमध्ये सलीम तडवी यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार अशोक जवरे, नेताजी वंजारी करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !