अट्टल घरफोड्या गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसांसह जाळ्यात : या शहरातील पोलिसांची कारवाई


नाशिक : नाशिकरोड व सिन्नर भागात घरफोडी करणारा अट्टल घरफोड्या यास नाशिक रोड पोलिसांनी (Nashik Road Police) गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसासह अटक केली. राहुल दिलीप धोत्रे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

अटकेतील आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार
रेकॉर्डवरील घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार राहुल दिलीप धोत्रे (22 वर्षे) सिन्नर फाटा परिसरामध्ये आलेला असून त्याचे जवळ बंदुकीसारखे हत्यार असल्याची खात्रीलायक बातमी नाशिकरोड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विशाल पाटील यांना मिळाली. त्यानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन करून सदर ठिकाणी जाऊन सशंयीत आरोपीस ताब्यात घेऊन कारवाई करण्याबाबत सुचना केल्या.

पोलिसांना पाहताच पळू लागला आरोपी
गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी खर्जुल सर्कल या ठिकाणी साध्या वेषात सापळा रचला असता सदर ठिकाणी सराईत गुन्हेगार राहुल दिलीप धोत्रे हा मोटार सायकलवर आला. त्यावेळी त्यास पोलीस पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने लगेच पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडतीमध्ये एक गावठी कट्टा व 3 जिवंत काडतुस व पल्सर मोटार सायकल असा एकुण 1 लाख 10 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला असल्यामुळे त्याचेविरुध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात कलम 71 / 2022 भाहका 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई नाशिक रोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल शिंदे (pi anil shinde) , पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे, एपीआय योगेश पाटील, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, हवालदार अनिल शिंदे, मनोहर शिंदे, विशाल पाटील, अविनाश देवरे, विष्णू गोसावी, राकेश बोडके, केतन कोकाटे, कुंदन राठोड, सोमनाथ जाधव, सागर आडणे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !