मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्सच्या पीआरओपदी नंदकिशोर अग्रवालांची निवड


भुसावळ : फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार नंदकिशोर अग्रवाल यांची अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एज्युकेशन या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश पीआरओपदी चार वर्षसाठी नियुक्ती करण्यात आली.

निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
सदरची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल पुणे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नरेंद्र अग्रवाल लातूर यांनी केली. याबाबतचे नियुक्ती पत्र देण्यात आले. निवडीबद्दल खान्देश शिक्षणचे माजी कार्याध्यक्ष बजरंग अग्रवाल,माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, आमदार शिरीष चौधरी, प्राचार्य पी. आर. चौधरी, प्रांताधिकारी कैलास कडलग, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, चंद्रशेखर चौधरी,बापू वाघुळदे, अग्रवाल नवयुवक मंडळ अध्यक्ष अ‍ॅड. गोकुळ अग्रवाल, संजय अग्रवाल रावेर, अमोल निंबाळे, कलीम मन्यार, अनिरुद्ध सरोदे, पप्पू चौधरी यांनी अभिनंदन केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !