रावेरातील स्वस्त धान्य दुकानातून साखरेसह धान्य वाटपाची मागणी
राष्ट्रवादी पदाधिकार्यांचे तहसील प्रशासनाला निवेदन : खाद्यतेलाचाही व्हावा पुरवठा
रावेर : रावेर शहरात रेशन दुकानांद्वारे धान्य व साखर मिळावी तसेच पूर्वीप्रमाणे खाद्यतेलदेखील वाटप करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष महेमूद शेख यांनी रावेर तहसीलदार कार्यालयाला निवेदन देऊन केली आहे. रावेर शहरात रेशन दुकानांद्वारे मिळणारे धान्य व साखर मिळालेले नाही शिवाय 2022 जानेवारी महिन्याचे मोफतचे धान्य बाकी असून फेब्रुवारी महिन्याचे नियमित व मोफत मिळणारे धान्य व साखर अद्याप मार्च महिन्याची 11 तारीख उजाडूनही मिळालेले नाही शिवाय जानेवारी व फेब्रुवारी महिन्याची अंत्योदय योजनेची साखरदेखील वाटप झालेली नाही. आधीच महागाईमुळे हातावर पोट असणार्या गरीब कुटुंबाचे प्रचंड हाल होत आहेत व खाद्यतेलाचे भाव देखील गगणाला भिडल्याने गरीब कुटुंबाना रेशन दुकानांद्वारे पूर्वी प्रमाणे खाद्यतेल वाटप करण्याची मागणी आहे.
निवेदन देताना यांची उपस्थिती
निवेदन देताना पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, प्रदीप गेरा, शुभम गेरा, शेख तायर, विसम अकरम, शे.रऊफ शे. कादर, शे.शकिल शे.गुलाम, निसार शेख, इम्रान खान, शेख नफीस, भागवत चौधरी, बबीता तडवी, हसीना तडवी, रईस जबार आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.


