चाळीसगावात पालिकेत 36 नगरसेवक निवडले जाणार : आता आरक्षण सोडतीकडे लागले लक्ष


चाळीसगाव :  मुदत संपलेल्या राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका करोना महामारीमुळे लांबल्या होत्या त्यामुळे पालिकांचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. तर ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती या सर्व कारणांमुळे नगरपालिच्या प्रभाग जाहीर होतील की नाही यावर शंका होती पण प्रभाग रचनेला लागलेले ग्रहण 10 मार्च रोजी सुटले आणि निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. चाळीसगाव नगरपालिकेचे प्रभाग रचना दिनांक 10 रोजी जाहीर झाल्याने इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे.ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने राज्य सरकारने प्रभागरचना व आरक्षण जाहीर करण्याचा अधिकार स्वतःकडे राखून ठेवला होता. मात्र राज्यसरकाच्या निर्णयाला न्यायालयाने विरोध करीत. निवडणुका थांबवण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार प्रभाग रचना जाहीर झाली त्याने आता इच्छुकांनी तयारीला सुरुवात केली.

प्रशासकांची नियुक्ती- चाळीसगाव नगरपालिकेचे मुदत 29 डिसेंबर रोजी संपली आहे त्यानंतर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.पालिका निवडणुका कधी होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते राज्य निवडणूक आयोगाने 1 एप्रिल रोजी प्रभाग रचना मान्यता तर पाच एप्रिल रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत.त्यानुसार 10 मार्च रोजी प्रभाग रचना जाहीर झाली. त्यावर हरकती-सूचना मागविण्याचे कालावधी 17 मार्च पर्यत असून या प्राप्त हरकती सूचनांवर 22 मार्च रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या दालनात सुनावणी होईल. 25 मार्च रोजी प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविली जाईल.नंतर 1 एप्रिल रोजी राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देईल. नंतर 5 एप्रिल रोजी अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी जळगाव जाहीर करतील असा कार्यक्रम आहे. प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होताच मनाप्रमाणे प्रभाग रचना झाली त्यांना खुशी तर ज्यांना अनपेक्षित प्रभागरचना झाल्याचं वाटते त्यांचा हिरमोड झाला असून त्यांनी हरकती साठी आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत.तसा प्रभाग रचनेत फारसा बदल नसल्याने हरकती कमीच येणार आहेत मात्र 17 नंबरचा प्रभाग विभागला गेला आहे.त्याने यात हरकती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



प्रभाग रचनेनुसार 1 प्रभाग आणि 2 नगरसेवक वाढणार- नगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाली असून आता आता 18 प्रभाग असणार आहेत म्हणजेच नवरसेवकांची संख्या देखील 2 ने वाढणार आहे मागील निवडणुकीत 17 प्रभाग होती. नगरसेवक संख्या 34 होती तर नगराध्यक्ष हा लोकनियुक्त होता.आता नगरसेवक 36 असतील तर नगराध्यक्ष देखील नगरसेवकांमधून निवडला जाईल.यंदाची निवडणूक 2011 च्या जनगणनेच्या आधारे होईल

आता आरक्षण सोडतीकडे सर्वांच्या नजरा- जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत फारसा बदल होणार नसल्याचं दिसते तर आता आरक्षण सोडतीकडे सर्वांचं लक्ष आहे. कुठल्या प्रभागात काय आरक्षण निघेल ते कधी जाहीर होईल याकडे सर्वांच्या नजर आहेत 2016 च्या मागील निवडणुकीत नगरसेवक संख्या 34 होती त्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग -4 ,नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला -5, सर्व साधारण -9 सर्वसाधारण महिला -10,अनुसूचित जाती- 2,अनुसूचित जाती महिला – 3, अनुसूचित जमाती महिला -1, असे आरक्षण निश्चित झाले होते.आता कुठल्या प्रभागात कुठलं आरक्षण निघेल नगराध्यक्ष पदाच आरक्षण काय निघते याकडे सर्वांचं लक्ष असेल.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !