राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार मंगळवारी जळगाव जिल्ह्यात
चांदसरला मुरलीधरअण्णांच्या पुतळ्याचे शरद पवारांच्या उपस्थितीत अनावरण
Sharad Pawar धरणगाव : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मंगळवार, 15 रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहेत. दौर्याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसलीतरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत मेळावा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिवंगत माजी आमदार मुरलीधर अण्णा पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण मंगळवार, 15 रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (MP Sharad Pawar) यांच्या हस्ते चांदरसर, ता.धरणगाव येथे होणार आहे.
अनेक मंत्र्यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमासाठी खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) हे मंगळवार, 15 मार्च रोजी सकाळी 9 वाजता चांदसर येथे येणार आहेत. या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक विकास पवार, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी दिली.


निवडणुकीच्या दृष्टीने दौरा महत्वपूर्ण
दरम्यान, शरद पवार (MP Sharad Pawar) यांच्या या दौर्यात ते राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पक्षाचा मेळावा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती कळू शकलेली नाही तसेच शरद पवार यांच्या दौर्याबाबतही माहिती समोर आलेली नाही.
-
भुसावळात शिवव्याख्याते अमोल मिटकरी यांचे आज व्याख्यान
-
शस्त्र तस्कर पकडले : भुसावळ बाजारपेठ पोलिस निरीक्षकांसह कर्मचार्यांचा आयजींनी केला सन्मान
-
भुसावळ शहर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शरद सोनवणे
